
Sinhagad Road Firing: किरकोळ वादातून सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे दोन गावठी कट्टयांतून भर चौकात गोळीबार; किरकोळ वादातून तब्बल तीन राऊंड फायर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
Sinhagad Road Firing: किरकोळ वादातून सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे दोन गावठी कट्टयांतून भर चौकात गोळीबार; किरकोळ वादातून तब्बल तीन राऊंड फायर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
खडकवासला: दोन्ही बाजूला बस थांबे, आजूबाजूला दुकाने, हॉटेल, खाजगी क्लासेस आणि अंदाजे पन्नास ते साठ नागरिकांची वर्दळ, सायंकाळी सातची वेळ असल्याने मुख्य सिंहगड रस्त्यावरही वाहनांची गर्दी असते आणि अशातच दोन गटांत हाणामारी सुरू होते. नागरिकांना काही कळण्याच्या आत तीन वेळा मोठे आवाज होतात आणि एकच गोंधळ उडतो. ते तीन आवाज गोळीबाराचे आणि तेही किरकोळ वादातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते.
कोल्हेवाडी चौकात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गाडी घासण्याच्या कारणावरुन दोन गटांत बाचाबाची झाली आणि काही वेळात हाणामारी सुरू झाली.प्रकरण इतके वाढले की टोळक्यातील दोघांनी थेट पिस्तूल काढून फायरिंग सुरू केली. दोन पिस्तूलांतून तीन राऊंड फायर झाले आणि गोळ्या संपल्यानंतर उलट्या पिस्तूल ने डोक्यात मारहाण करण्यात आली. यात काहीजण जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. यात सर्वसामान्य नागरिक थोडक्यात बचावले आहेत.
खडकवासला व परिसर शहर आयुक्तालयात गेल्यानंतर गुन्हेगारी कमी होईल असे वाटले होते. पोलीसांचा वचक राहिल असे वाटले होते परंतु दुर्दैवाने तसे दिसत नाही. भर रस्त्यावर, चौकात दोन-दोन गावठी पिस्तूल घेऊन टोळीयुद्ध होत असेल तर पोलीस काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतक्या बेछूटपणे गोळीबार होत असेल तर पोलीसांचा धाक कुठे आहे? नांदेड सिटी पोलीस आणि एकूणच पुणे शहर पोलीसांनी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. तसेच या घटनेमागे इतर काही कारणे आहेत का याचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे.








