
खडकवासला-एनडीए गेट जवळील आदिवासी कातकरी कुटुंबांना दिवाळीची भेट! खडकवासला गावचे माजी सरपंच संतोष मते यांचा पुढाकार
खडकवासला-एनडीए गेट जवळील आदिवासी कातकरी कुटुंबांना दिवाळीची भेट! खडकवासला गावचे माजी सरपंच संतोष मते यांचा पुढाकार
खडकवासला: खडकवासला व एनडीए गेट येथील आदिवासी कातकरी कुटुंबांना खडकवासला गावचे माजी सरपंच संतोष उर्फ दिवाकर शिवाजी मते यांच्या वतीने किराणा सामान व मिठाईचे वाटप करण्यात आले. निरपेक्ष भावनेने ही मदत करण्यात आल्याचे संतोष मते यांनी सांगितले.
खडकवासला परिसरातील हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या आदिवासी कातकरी कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सातत्याने त्यांच्या व्यथा समाजासमोर मांडल्या आहेत. मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या संस्था, संघटना, पदाधिकारी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या आवाहनाला प्रतिसाद देत आदिवासी कातकरी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने आधार देण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे आदिवासी कातकरी नागरिकांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळत आहे.
खडकवासला गावचे माजी सरपंच संतोष मते यांनीही ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून आदिवासी कातकरी कुटुंबांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज किराणा सामान व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संतोष मते यांच्यासह अनिल मते, रमेश गायकवाड, महेश मते, साहिल मते, प्रशांत हगवणे, यश मते, सोमेश मते, महेश कराडे आदी उपस्थित होते.










