♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ACP धुमाळ यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप, गुढ मात्र कायम;सोनके गावावर शोककळा

सोनके(सातारा): पुणे पोलिस आयुक्तालयातील फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांना सोनके(ता. कोरेगाव जि. सातारा) या त्यांच्या मुळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शांत, संयमी अधिकारी गेल्याने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित सहकारी, मित्र, नातेवाईक या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. सोनके गावासह पंचक्रोशीत धुमाळ यांच्या अकाली जाण्यामुळे शोककळा पसरली आहे.

 

दि 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अशोक धुमाळ हे त्यांच्या कात्रज जवळील आंबेगाव परिसरातील राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून? गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

 

काल पुन्हा अचानक त्यांची प्रकृती ढासळल्याने पुन्हा अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले मात्र रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज धुमाळ यांच्यावर त्यांच्या सोनके या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक धुमाळ यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

गुढ मात्र कायम

डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून ACP अशोक धुमाळ हे अचानक तनावाखाली आले होते. इतके वर्ष पोलीस खात्यात सेवा केली परंतु असा त्रास कधी झाला नव्हता असे ते आपले जवळचे सहकारी व कुटुंबियांना सतत म्हणत होते. आता मला जगण्याची इच्छा राहिली नाही असे धुमाळ सतत म्हणत असल्याने कुटुंबिय व नातेवाईक त्यांची समजूत काढत होते. त्यामुळे त्यांना नेमकं कोण माणसिक त्रास देत होतं? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? याबाबत गुढ कायम आहे. दबक्या आवाजात अनेक चर्चा सुरू आहेत मात्र खात्रीशीर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे धुमाळ यांना न्याय मिळावा म्हणून याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles