
ती 16 वर्षांची तो 24 वर्षांचा, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा ….. दोघांनी खडकवासला धरणामागे औषध प्रशासन केले अन्….
ती 16 वर्षांची तो 24 वर्षांचा, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा ….. दोघांनी खडकवासला धरणामागे औषध प्रशासन केले अन्….
पुणे: काल सकाळच्या सुमारास उत्तमनगर पोलीसांना नागरिकांनी फोन करुन माहिती दिली की, खडकवासला धरणामागे एनडीए-बहुली रस्त्यालगत पाटबंधारे विभागाच्या जागेत ऑक्सिजन पार्क चे काम सुरू आहे तेथे झुडपामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत व जवळच एक औषधाची बाटली पडलेली आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी पोचले.
तरुण व तरुण पडलेली जागा रस्त्यापासून खुप आत आणि काटेरी झाडाझुडुपांमध्ये होती. पोलीसांनी स्थानिक तरुणांना मदतीला घेऊन दोघांना बाहेर काढले व तातडीने ससून रुग्णालयात उपचारांसाठी पाठवून दिले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान दोघांची ओळख पटल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृत 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी 24 वर्षांचा तरुण यांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस व नातेवाईक शोध घेत होते परंतु माहिती मिळत नव्हती. काल दोघेही विषारी औषध पिऊन खडकवासला धरणामागे बेशुध्द अवस्थेत आढळून आले व तपासणी दरम्यान दोघेही मृत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत चा गुन्हा वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल असल्याने वानवडी पोलीस अधीक तपास करत आहेत.








