
हवेली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना तीन वेळा मारहाण… बेकायदा शस्त्र बाळगणे, तोडफोड करत दहशत माजविणे असे अनेक गुन्हे…. अखेर नांदेड सिटी पोलीसांनी MPDA कायद्याने केले स्थानबद्ध
हवेली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना तीन वेळा मारहाण… बेकायदा शस्त्र बाळगणे, तोडफोड करत दहशत माजविणे असे अनेक गुन्हे…. अखेर नांदेड सिटी पोलीसांनी MPDA कायद्याने केले स्थानबद्ध
किरकटवाडी: खडकवासला व किरकटवाडी परिसरात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करुन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार वैभव बाळासाहेब इक्कर (वय 25 रा. कोल्हेवाडी) याच्यावर नांदेड सिटी पोलीसांनी MPDA कायद्यांतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई केली असून त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. वैभव इक्कर याची सर्वसामान्य नागरिकांसह पोलीसांमध्येही मोठी दहशत आहे.
वैभव इक्कर याच्यावर चक्क पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. एकदा तर थेट हवेली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना त्याने मारहाण केली होती. कोल्हेवाडी येथील एका हॉटेलची तोडफोड करत असताना तत्कालीन हवेली पोलीसांची गाडी तिथे गेली असता गाडीवर बाटल्या फेकून मारल्या होत्या. तसेच हवेली पोलीस स्टेशननचा गोपनीयचा कर्मचारी आणि एक पोलिस अधिकारी रस्त्याने पुढे पळत होते आणि वैभव इक्कर त्यांच्या मागे पळत होता. त्यावेळी हवेली पोलीसांची अक्षरशः अब्रू गेली होती. आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी मात्र वैभव इक्कर याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत धडा शिकवला होता.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड सिटी पोलीसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाया करण्यात येत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हिलांस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड अंमलदार कैलास केंद्रे, प्रथमेश गुरव, अनिल बारड यांनी वैभव इक्कर याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला होता. त्याला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंजुरी दिली असून वैभव इक्कर यास अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.








