PMPML Bus Fire:सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत पीएमपीएमएल बसला भीषण आग;कारण अस्पष्ट; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत पी एम पी एम एल बसला भीषण आग लागली आहे. सीएनजी बस असल्याने भर पावसात मोठी आग भडकलेली असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे मनसेचे विजय मते, कालिदास चावट यांनी सांगितले.