♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नशेत बेधुंद झालेल्या बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने पुण्यात दोघांना चिरडले; येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल; आरोपीला जामीनही मंजूर 

पुणे: कल्याणीनगर परिसरात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एका बड्या उद्योगपतीच्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने अलिशान कार भरधाव वेगाने चालवून अनेक वाहनांना धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु धक्कादायक म्हणजे बेदरकारपणे कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपी वेदांत विशाल अगरवाल याला आज जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

अनिस अवलिया(वय 24) आणि अश्विनी कोस्टा (वय 24, दोघेही मूळ राहणार मध्य प्रदेश) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. कारची धडक एवढी जोरदार होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर नशेत बेधुंद असलेला आरोपी वेदांत अगरवाल हा पळून जात असताना परिसरातील नागरिकांनी व घटनास्थळी जमा झालेल्या संतप्त प्रत्यक्षदर्शींनी त्याला चोप दिला परंतु त्या दुर्दैवी तरुण-तरुणीला मात्र या नशेडीच्या बेजबाबदारपणामुळे जीव गमवावा लागला.

या अपघातामुळे निर्माण झालेले प्रश्न 

• अल्पवयीन असताना कार ताब्यात दिल्याने आरोपी वेदांत अगरवाल याच्या बेजबाबदार पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का?

•गाडीवर नंबरप्लेट का नव्हती?

•वाहतूक पोलीस काय करत होते?

•आतापर्यंत कधीच ही कार रस्त्यावर आली नव्हती का?

•सर्वसामांन्यांचा खिशावर दरोडा टाकणारे चौकाचौकातील सीसीटीव्ही कॅमेरे इतके दिवस काय करत होते?

 

अपघाताचे मूळ पब?

या अपघाचे मूळ हे पुण्यातील उच्चभ्रू भागात बोकाळलेली पब संस्कृती असल्याचे बोलले जात आहे. पब चा ‘खेळ’ अगदी पहाटेपर्यंत चालू असतो आणि त्यात अशा बड्या बापांचे बेलगाम वारस बेधुंद झालेले असतात. अर्थात पोलीसांना याबाबत माहिती नाही असा गैरसमज करण्याचे कारण नाही. धक्कादायक म्हणजे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या पबमध्ये आतून ‘भागिदाऱ्या’ असल्याची कुजबुज ऐकायला मिळते. त्यामुळे पबचालकांना कायद्याचा धाक असण्याचे कारण नाही. यात मात्र इतरांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. हा ‘रात्रीचा खेळ’ थांबविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त काही धडक कारवाया करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles