♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Bail in Mocca: वकिलांच्या युक्तीवादाला तांत्रिक पुराव्यांचा आधार; काळेपडळ येथील सनी हिवाळे खून प्रकरणात मुख्य आरोपीला मोक्का कोर्टाकडून जामीन मंजूर 

पुणे: गुन्हेगारीतील वर्चस्ववादातून वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेपडळ येथे झालेल्या खून प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेला मुख्य आरोपी सचिन नवले याला जामिन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी जबाब विरोधात असताना तांत्रिक पुरावे, आरोपीने वेळोवेळी केलेल्या तक्रारी आणि त्या आधारावर आरोपीचे वकील ॲड शरद भोईटे यांनी केलेला तर्कसंगत युक्तिवाद या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने मुख्य आरोपी सचिन नवले याला जामीन मंजूर केला आहे.

12 एप्रिल 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसोबा चौकात भर रस्त्यावर सनी हिवाळे याची सात ते आठ जणांनी कोयते, फालगन व लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली होती. गुन्हेगारीतील वर्चस्ववाद व पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. फिर्यादीत इतर आरोपींसह सचिन नवले हा मुख्य आरोपी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

आरोपी सचिन नवले याने मात्र आपला या खुनात सहभाग नसल्याचे व गुन्हा घडला त्यावेळी आपण घटनास्थळी नसल्याचे वेळोवेळी कोर्टात सांगितले होते. पोलीस आपल्याला या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याने वस्तूनिष्ठ तपास व्हावा अशीही मागणी वकील ॲड शरद भोईटे यांच्या माध्यमातून नवले याने कोर्टाकडे केली होती. तांत्रीक बाबींची पडताळणी करत असताना गुन्हा घडला त्यावेळी आरोपी सचिन नवले हा घटनास्थळी नसल्याचे दिसून आले. त्याआधारे मोक्का कोर्टाने आरोपी सचिन नवले यास जामीन मंजूर केला आहे.

 

“घडलेली घटना ही अतिशय गंभीर व दुर्दैवी आहे. तसेच एखाद्या निरापराध वक्तीला त्यामधे अडकवणे हे त्या पेक्षा गंभीर आहे. कारण या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून आणि आरोपीच्या सहभागाबद्दल सांगत असून देखील माननीय न्यायालयाने माझा यूक्तीवाद ग्राह्य धरुन जामीन मंजूर केला .आरोपी सचिन नवले अटक केल्या पासून ज्या वेळेस प्रसंग येईल तेव्हा माझ्या मार्फत आपली बाजू माननीय न्यायालयासमोर या गुन्ह्यात खोटे अडकवल्याबद्दल मांडत होता. अखेर त्याला न्याय मिळाला.” ॲड. शरद भोईटे, आरोपीचे वकील.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles