♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याची असंवेदनशीलता; ऑनलाईन पावती करुनही गाडी ठेवली अडवून;पाच वर्षांची चिमुरडी रडत असताना दुर्लक्ष

  1. पुणे: पुणे वाहतूक पोलीस दलातील सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याने नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर ऑनलाईन पावती टाकली मात्र संबंधित वाहनचालकाने पाच वर्षांची चिमुरडी सोबत असल्याने व ती रडत असल्याने गाडी सोडण्याची विनंती केली मात्र अत्यंत असंवेदनशील असलेला संबंधित पोलिस कर्मचारी काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तब्बल एक तास वडगाव येथील पुलाखाली दुचाकी साखळदंडाने बांधून ठेवण्यात आली होती.

आंबेगाव येथे राहणारे संजय विधाते हे आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे दुकानात गेले होते. नजरचुकीने त्यांनी गाडी नो पार्किंग मध्ये उभी केली. काही मिनीटांत सिंहगड रोड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण कर्चे यांनी विधाते यांची गाडी उचलून आणली.

संजय विधाते आपल्या पाच वर्षांच्या मुलीला भर उन्हात उचलून घेऊन वडगाव पुलाखाली वाहतूक शाखेत आले. ‘ऑनलाईन पावती केली असल्याने मी नंतर पैसे भरतो, मुलगी रडतेय गाडी सोडा साहेब’ अशी सातत्याने संजय विधाते हे वाहतूक पोलीस लक्ष्मण कर्चे यांना विनंती करत होते मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही.

एक तासानंतर प्रभारी अधिकारी राजकुमार बर्डे आल्यानंतर मागील काही दंड बाकी आहे का अशी विचारणा त्यांनी विधाते यांच्याकडे केली. मागील दंड बाकी नसल्याचे विधाते यांनी सांगितल्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांनी गाडी सोडण्यास सांगितली. तब्बल एक तासापेक्षा जास्त काळ विधाते यांची गाडी नाहक अडवून ठेवण्यात आली. विधाते यांची लहान मुलगी रडत असतानाही जाणीवपूर्वक पोलीस कर्मचारी कर्चे यांनी दुर्लक्ष केले. वरिष्ठ अधिकारी अशा मनमानी कारभार करणाऱ्या असंवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles