♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Koyata Gang: सिंहगड रस्त्यावरील एनडब्ल्युए गेट जवळ कोयता गॅंगचा थरार; पूर्ववैमनस्यातून दुचाकीला कारने धडक; कारमध्ये आढळले चार कोयते

पुणे: सिंहगड रस्त्यावरील एनडब्ल्युए गेट जवळ दुचाकी व कारचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. याबाबत आता धक्कादायक खुलासा झाला असून पूर्ववैमनस्यातून जाणीवपूर्वक दुचाकीला मागून धडक दिल्याचे निष्पन्न झाले आहे. कारमध्ये चार कोयते आढळून आले असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथील तरुण आपल्या दुचाकीवरून नांदेड फाट्याच्या दिशेने जात होता. सिंहगड रस्त्यावरील एनडब्ल्युए गेट जवळ मागून आलेल्या अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने तरुण खाली पडला. घातपाताची शक्यता लक्षात आल्याने दुचाकीवरील तरुण तेथून पळाला व 112 क्रमांकावर फोन केला. तातडीने पोलीस चंद्रकांत शिंदे घटनास्थळी दाखल झाल्याने कारमधील तरुणही कार सोडून पळून गेले.

पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये चार धारदार कोयते आढळून आले. याबाबत दुचाकीवरील तरुण शिवम बरिदे उर्फ चिक्या याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या, हत्तेचा प्रयत्न, भर रस्त्यावर कोयत्याने दहशत माजविणे, सराईत गुन्हेगारांमधील हाणामारी अशा घटना सातत्याने घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस नेमके काय करत आहेत? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles