♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sinhagad Forest Fire:जंगल पेटविणाराची माहिती द्या आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळवा; समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी वन विभाग सरसावला

पुणे: सिंहगड परिसरातील जंगलामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आग भडकलेली असून ही आग लावणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आता वन विभागाने माहिती देणारास 5000 रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशीही माहिती भांबूर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली आहे.

सिंहगड परिसरातील जंगलातील वनसंपदेची सध्या मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आग भडकलेली असून दुर्गम भाग व वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. वन विभागाने काही ठिकाणी जाळरेषा काढलेल्या आहेत मात्र जाणीवपूर्वक जाळरेषांच्या मधल्या भागात आग लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सिंहगड परिसरातील आगीच्या घटनांबाबत मनेरवाडी येथील वन्यजीव प्रेमी अक्षय जाधव हे सातत्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याबाबत लक्ष वेधून घेत असून कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

जंगलाला आग लावणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून त्यांनी 1926 या ‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्पलाईन वर आग लावणाऱ्याचे नाव कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व रोख 5000 रुपये बक्षीस देण्यात येईल अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली आहे. नागरिक या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles