♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अखेर संशय खरा ठरला; सोसायटीतीलच निघाला ‘चोर’; किरकटवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

पुणे: किरकटवाडी येथील चोरीचा छडा लावण्यात हवेली पोलीसांना यश आले असून संशयानुसार सोसायटीत राहणाऱ्याच सतरा वर्षांच्या तरुणाने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. रात्री उशिरा या तरुणाने आपण चोरी केल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे चोरलेले दागिने या तरुणाने कोल्हेवाडी येथील एका सोनाराला विकल्याचेही समोर आले आहे.

किरकटवाडी येथील उत्सव सोसायटीत सी विंगच्या चौथ्या मजल्यावर 404 नंबरच्या सदनिकेचे कुलुप उघडून काल अज्ञात चोराने सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. लपवून ठेवलेली चावी घेऊन चोरी करण्यात आल्याने ही चोरी सोसायटीत राहणाऱ्या व चावी कोठे ठेवतात याची माहिती असलेल्या ओळखीच्या व्यक्तीने ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत होता. तसेच सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या.

हवेली पोलीसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता रात्री उशिरा त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून चोरलेले दागिने कोल्हेवाडी येथील एका सोनाराला विकल्याचेही सांगितले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

सोनाराने दागिने घेतलेच कसे?

तरुणाने चोरलेले दागिने घाईघाईने जाऊन कोल्हेवाडी येथील चोराला विकले. संबंधित सोनारानेही खातरजमा न करता किंवा पावती न पाहता दागिने ठेवून घेतले. यावरुन सोनाराचे कृत्यही संशयास्पद आहे. चोरी केल्याबाबत तरुण जसा दोषी आहे त्याचप्रमाणे चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार देखील दोषी असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles