♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Behind the Murder:सहज मिळणारे अंमली पदार्थ आणि शाळकरी मुलांमध्ये वाढते नशेचे प्रमाण; बाल गुन्हेगारीचे मूळ शोधून कारवाई होणार का? सिंहगड परिसरातील खूनाच्या घटनेने प्रश्न ऐरणीवर  

पुणे: काल सिंहगडाच्या पश्चिमेकडील मनेरवाडी गावच्या हद्दीत असलेल्या आनंदवन सोसायटीच्या परिसरात नववीत शिकणाऱ्या प्रकाश हरिसिंग रजपूत या अवघ्या पंधरा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे हत्या करणारेही अल्पवयीन म्हणजे दहावीत शिकणारे असल्याची माहिती तपासातून समोर आली. दहावीत शिकणाऱ्या मुलांचं एखाद्याचा खून करण्याइतकं धाडस होतंय ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. सद्यस्थितीत ही गंभीर समस्या बनली असून यात पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीचे एका मुलीवर प्रेम होते. आरोपीला दारुचे, गांजा ओढण्याचे व्यसन लागल्याने मुलीने आरोपीशी बोलने बंद केले होते. सध्या संबंधित मुलगी दुसरीकडे राहण्यास गेलेली आहे. मयत प्रकाश चा भाऊ आणि आरोपी हे खानापूर येथील विद्यालयात दहावीत शिकत असून सध्या त्यांचे पेपर सुरू आहेत. मयत प्रकाशच्या भावाने आपल्याबाबत मुलीला काहीतरी सांगितले म्हणून तिने बोलने बंद केले असावे असा आरोपीचा समज झाला होता. दहावीचा विज्ञान भाग एक चा पेपर असल्याने इतर वर्गांची शाळा सकाळची होती. प्रकाश शाळा सुटल्यावर घरी आला व दुपारी जेवण करुन झोपला होता. आई मोलमजुरी करण्यासाठी गेलेली होती. वडीलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.

दहावीचा पेपर सुटल्यानंतर प्रकाश चा भाऊ गोऱ्हे बुद्रुक येथे नातेवाईकांकडे गेला. आरोपी घरी गेले व त्यांनी झोपलेल्या प्रकाशवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी तपास करुन दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. वर्गात अत्यंत शांत असलेल्या व परिस्थितीची जाण असलेल्या कोवळ्या प्रकाशचा या प्रकरणात नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

सहज मिळणारे नशेचे पदार्थ आणि आहारी गेलेले शाळकरी मुले

खानापूर येथे बाल गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागे मूळ कारण हे नशा आहे. खानापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या कडेला सायंकाळी लहान मुलांच्या झुंडीच्या झुंडी नशा करण्यासाठी घिरट्या घालत असतात अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर स्थानिकांनी दिली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आरोपी पकडले असले तरी अल्पवयीन आरोपींना काय शिक्षा होणार?‌ गुन्हेगारी घटना रोखायच्या असतील तर अगोदर पोलीसांना आपली भूमिका बदलावी लागणार आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात मादक पदार्थांची विक्री करणारी ठिकाणं शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. भविष्यात आणखी एखाद्या ‘प्रकाश’च्या आयुष्यात कायमचा ‘अंधार’ येणार नाही यासाठी सामाजिक भान ठेवून पोलिसांनी कर्तव्य बजावणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles