♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोऱ्हे बुद्रुक येथे तिघांवर हल्ला करणाऱ्या कोयता गॅंगमधील सहा आरोपी अटकेत; अर्ध्यापेक्षा जास्त अद्यापही फरारच

पुणे: गोऱ्हे बुद्रुक येथे तीन तरुणांवर तलवार व कोयत्याने हल्ला करणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात हवेली पोलीसांना यश आलेले असले तरीही अद्याप अर्ध्यापेक्षा जास्त कोयता गॅंग फरार असल्याचे चित्र आहे. दोन अल्पवयीन आरोपींनाही पोलीसांनी ताब्यात घेतले होते. गणेश राजू खुडे(वय 24, धायरी), सोमनाथ गुलाब पवार (वय 19, धायरी), यश चंद्रकांत जावळकर (वय 19, खानापूर), अनिरुद्ध अमित ठाकूर (वय 19, धायरी), ओंकार संतोष पोळेकर (वय 19, धायरी), हमजा कमरअली शेख(वय 22, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बुधवार 6 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे भर चौकात दहा ते पंधरा जणांनी गोऱ्हे बुद्रुक येथील तिन तरुणांवर कोयते व तलवारींनी जिवघेणा हल्ला करत दुचाकीची तोडफोड केली होती. या हल्ल्यात तिनही तरुणांना धारदार शस्त्राचे घाव बसल्याने खोल जखमा झाल्या होत्या.

ही सर्व घटना ग्रामपंचायतीने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दबा धरून बसेले दहा ते पंधरा पेक्षा जास्त हल्लेखोर समोर येताना स्पष्ट दिसत आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ आठ आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून अर्ध्यापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत. याबाबत तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles