Murder: धायरी येथे तरुणाचा खून; पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे: सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील पाटलाची माची परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आदित्य पोकळे (वय 26, रा. ग्रामपंचायत जवळ, पोकळेवाडा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिंहगड रोड पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.