♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवैध धंदेवाला आणि हवेली पोलीस कर्मचाऱ्याची धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग; अवैध धंदेवाल्यांना ‘निरोप’ देणाऱ्या आणि हप्ते वाढविण्यासाठी ‘मेगा बैठका’ घेणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे लक्ष

पुणे: हवेली पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची अत्यंत धक्कादायक फोन रेकॉर्डिंग ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या हाती लागली असून हा पोलीस कर्मचारी अवैध धंदेवाल्याला पळून जाण्याचा सल्ला देताना ऐकायला मिळत आहे. पोलीस आणि अवैध धंदेवाले यांचे ‘संबंध’ सर्वश्रुत आहेत मात्र हा पोलीस कर्मचारी आपल्या अंगावरील खाकी वर्दीशी ‘बेइमानी’ करत असल्याचे दिसून येत आहे.

हवेली पोलीस ठाण्यातील हा कर्मचारी सातत्याने हद्दीतील अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात असून तो कारवाई होणार असेल किंवा कोणी कारवाई करण्यासाठी येणार असेल तर धंदेवाल्यांना ‘निरोप’ देण्याचे ‘धंदे’ करतो. नुकतीच काही दिवसांपूर्वी याच पोलीस कर्मचाऱ्याने आणखी एका पोलीस सहकाऱ्यासह हवेलीच्या हद्दीतील सर्व हॉटेल, बार, फार्महाऊस, रेस्टॉरंट्स चालकांची ‘मेगा बैठक’ घेऊन हप्ता वाढविण्याचा ‘ठराव’ केल्याचे ऐकायला मिळत आहे. तसेच ‘एसपी साहेब’ कडक आलेत चोरुन धंदे करा असा ‘कानमंत्र’ही या पोलीस कर्मचाऱ्याने अवैध धंदे चालकांना दिल्याची माहिती आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. पोलीस प्रशासनातील ‘फितूरी’ थांबावी म्हणून हवेली पोलीस ठाण्यातील या पोलीस कर्मचाऱ्यावर ते काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles