♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयात आमरण उपोषण

मुंबई: हवेली ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांची बातमी केली म्हणून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी कुख्यात गांजा व्यापाऱ्याला पुढे करुन जीवे मारण्याची धमकी द्यायला लावली व त्यानंतर त्यालाच पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन खोटी तक्रार द्यायला लावली याच्या निषेधार्थ व असे भ्रष्ट आणि समाजविघातक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना तातडीने निलंबित करुन त्यांची करुन त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयात बसून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

दि 23 जानेवारी 2024 रोजी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांची बातमी ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेली आहे. त्याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथील अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गांजा व्यापाऱ्याने बातमी का केली म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तातडीने संबंधित गांजा व्यापाऱ्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.धक्कादायक म्हणजे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी काही वेळानंतर संबंधित गांजा व्यापाऱ्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन खोटी तक्रार द्यायला लावली.

पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पत्रकाराची बदनामी करण्यासाठी व लेखणीचा आवाज दाबण्यासाठी गांजा व्यापाऱ्याला सोबत घेऊन रचलेला हा कट लक्षात आल्यानंतर तातडीने पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रार अर्ज देण्यात आला. दि. 29 जानेवारी रोजी हा तक्रार अर्ज राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक यांना स्पीड पोस्ट ने पाठविण्यात आला.

12 फेब्रुवारी पर्यंत सदर भ्रष्ट व समाजविघातक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावर कारवाई झाली नाही तर पोलीस महासंचालक कार्यालयात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. पोलीस प्रशासनाकडून संपर्क करुन उपोषण न करण्यासाठी आवाहन करण्यात आले परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

खोटी तक्रार दिल्याची गांजा व्यापाऱ्याची कबुली

बातमीत गांजाचा उल्लेख असल्याने व गांजा म्हटलं की माझेच नाव येते म्हणून आपण धमकी दिल्याची व त्यानंतर खोटी तक्रार दिल्याची कबुली संबंधित गांजा व्यापाऱ्याने दिली आहे. याबाबतचे संपूर्ण संभाषण पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. वरिष्ठ अधिकारी या खाकी वर्दीला कलंक असलेल्या पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावर कधी कारवाई करणार?

तक्रार दाखल करण्यासाठी ‘खास’ कर्मचाऱ्याला बसविले

23 जानेवारी रोजी सहाय्यक फौजदार कदम हे ठाणे अंमलदार होते. तक्रार ऐकून घेण्याची व दाखल करण्याची पूर्ण जबाबदारी नियमानुसार ठाणे अंमलदाराची असते. गांजा व्यापारी रामदास सोनवणे याला पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांची त्यांच्या ‘खास’ दप्तरीला रामदास सोनवणे याची खोटी तक्रार दाखल करुन घ्यायला लावली. याबाबत सखोल चौकशी होऊन या कटात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा कातद्याचा गैरवापर करुन सर्वसामान्य नागरिकांना अडकविण्याचे धंदे सुरू राहतील.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles