♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हा आत्ताच मर्डरच्या गुन्ह्यातून सुटून आलाय, गप गाडीची चावी दे; दुसऱ्याने घेतलेल्या पैशांसाठी दांपत्याला धमकावले; पोलिसांचेही आरोपीलाच ‘सहकार्य’? अखेर पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज

पुणे: “हा आत्ताच मर्डरच्या गुन्ह्यातून सुटून आलाय गप गाडीची चावी दे, दिलीप प्रभुणे याने माझी दीड लाख रुपयांची फसवणूक केली आहे ते रोख दीड लाख रुपये तू मला दे तोपर्यंत तुझी गाडी देणार नाही,” असे म्हणत दमबाजी करत शिरीष शिंदे( रा. राजयोग सोसायटी, कात्रज,पुणे.) या व्यक्तीने स्नेहल कालिंदर पोवार(रा. मनिषा अपार्टमेंट, कांडगे पार्क, माणिकबाग,सिंहगड रोड,पुणे.) यांची  टाटा सफारी ही गाडी जबरदस्तीने नेली. याबाबत स्नेहल पोवार व त्यांच्या पत्नीने अनेक वेळा सिंहगड रोड पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या वडगाव पोलीस चौकीत तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित पोलिस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. अखेर पोवार यांनी थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली मात्र तरीही संबंधित पोलिस चौकीचे पोलीस तक्रारदारांऐवजी आरोपींनाच सहकार्य करताना दिसत आहेत.

स्नेहल पोवार यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार ते स्वामी समर्थांचे पेंटींग तयार करुन त्याची विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. 2020 साली पोवार यांची याच माध्यमातून कात्रज येथील शिरिष शिंदे यांच्याशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर शिंदे यांनी त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी दिड कोटी रुपये कर्ज आवश्यक असल्याचे पोवार यांना सांगून काही मदत करता येतेय का अशी वारंवार विनंती केली. त्यावेळी फायनान्स कन्सल्टंट असलेल्या दिलीप प्रभुणे यांच्याशी माझी ओळख असून ते तुम्हाला मदत करतील मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो असे पोवार यांनी शिंदे यांना सांगितले.

पोवार यांनी शिंदे आणि प्रभुणे यांची भेट घालून दिल्यानंतर त्यांचे परस्परांशी बोलणे झाले व व्यवहार ठरला. फेब्रुवारी 2023 पासून अचानक शिरिष शिंदे हे दिलीप प्रभुणे यांनी माझी दीड लाख रुपये फसवणूक केली आहे आहे आणि तुमच्यामुळेच माझी त्यांच्याशी ओळख झाली असे म्हणत पोवार यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावू लागले. 8 फेब्रुवारी 2023 रोजी शिंदे त्यांच्यासोबत काही गुंडांना घेऊन आले व पोवार यांची टाटा सफारी गाडी जबरदस्तीने घेऊन गेले.

हतबल झालेल्या पोवार दांपत्याने वडगाव बुद्रुक येथील पोलिस चौकीत जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार घेतली नाही. अखेर पोवार यांनी 11 जानेवारी 2024 रोजी थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर वडगाव पोलिस चौकीच्या अधिकाऱ्यांना जाग आली व त्यांनी शिरिष शिंदे यांना फोन करून पोवार यांची गाडी चौकीला आणून लावण्यास सांगितली. वडगाव पोलीस चौकीतील एका अधिकाऱ्याने पोवार यांना फोन केला व तुमची गाडी चौकीपुढे आहे ती घेऊन जा असे सांगितले. त्यानुसार पोवार दांपत्य गाडी आणण्यासाठी चौकीत गेले असता तेथे फोन करणारे अधिकारी उपस्थित नव्हते. उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीबाबत आपल्याला काही माहिती नसून चावी वगैरे काही नाही असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोवार यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी फोन केला होता त्यांना पुन्हा फोन केला असता त्यांनीही मी सुट्टीवर आहे , तुम्हाला गाडी कशी न्यायची तशी घेऊन जा,चावी कोणाकडे आहे मला माहित नाही असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली.

“माझा प्रत्यक्ष व्यवहारात काहीही संबंध नसताना शिंदे यांनी गुंडांच्या मदतीने माझी गाडी अनेक महिने ताब्यात ठेवली. त्यावेळी सुस्थितीत असलेल्या गाडीची अवस्था सध्या अत्यंत खराब असून माझे नुकसान झाले आहे. पोलीस मला सहकार्य करण्याऐवजी आरोपीला मदत करत असल्याचे जाणवत आहे. मला न्याय मिळावा.” स्नेहल कालिंदर पोवार

“पोवार यांचा तक्रार अर्ज पोलिस ठाण्याला प्राप्त झालेला आहे. वडगाव पोलीस चौकीचे संबंधित अधिकारी सुट्टीवर आहेत. तक्रारदारांना योग्य सहकार्य केले जाईल.” अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे शहर.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles