♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बनावट स्कॉच कारखाण्यावर छापा; सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त;आरोपी अटकेत

पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुण्यातील कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुक येथील बनावट स्कॉच बनविण्यात येत असलेल्या कारखाण्यावर छापा टाकून 10,39,474 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी महेशभाई हरिभाई कोळी ( रा. फ्लॅट नं. 17, बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे 411011.) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांना आंबेगाव बुद्रुक येथे बनावट स्कॉच बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता बनावट परदेशी स्कॉचच्या 34 सीलबंद बाटल्या, दोन दुचाकी,551 रिकाम्या बाटल्या, बूच, मोनोकार्टुन, हेअर ड्रायर,शेगडी, प्लास्टिक पॅकींग रोल, मोबाईल असा सुमारे 10,39,474 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन महेशभाई हरिभाई कोळी याला अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क सी विभाग,पुणे चे निरीक्षक आर.पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन.एन. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. लोहकरे, एस. एस. इंदलकर, जवान शरद भोर, गोपाल कानडे, उज्वला भाबड यांनी ही कारवाई केली. सी विभागाचे निरीक्षक राजाराम शेवाळे याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुंबई-पुण्यात विक्री

बनावट स्कॉच तयार करुन त्याची मुंबई व पुण्यामध्ये विक्री केली जात असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपीने दिली आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवरून माल पोचवला जात असल्याचीही माहिती संबंधित आरोपीने दिली आहे. अधिक नफा कमविण्यासाठी कोणकोणते वाईन शॉप चालक, बार चालक हे बनावट मद्य खरेदी करत होते याबाबत तपासातून माहिती समोर येणार आहे.

“स्वस्तात मिळणाऱ्या परदेशी बनावटीच्या मद्यावर विश्वास ठेवू नका. त्यामध्ये देशी मद्य अथवा इतर रसायनांची भेसळ असू शकते. जर कोणी असे बनावट मद्य बनवून विक्री करत असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभाग सदर प्रकरणी सखोल तपास करणार आहे.” चरणसिंग राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे.

 

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles