
नांदोशी येथील उद्योजक नवनाथ घुले यांच्याकडून सणसनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेस दीड किलो चांदिचे मुकुट अर्पण;टाळ- मृदंगाच्या गजरात पार पडला सोहळा
नांदोशी येथील उद्योजक नवनाथ घुले यांच्याकडून सणसनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेस दीड किलो चांदिचे मुकुट अर्पण;टाळ- मृदंगाच्या गजरात पार पडला सोहळा
सणसनगर: नांदोशी येथील उद्योजक नवनाथ घुले यांच्याकडून सणसनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेस दीड किलो चांदीचे आकर्षक रत्नजडित मुकुट अर्पण करण्यात आले आहेत. आज सकाळी गावातील भजणीमंडळ, नागरिक यांच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी घुले परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
सणसनगर येथे लोक सहभागातून भव्य विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदीर उभारण्यात आले असून काही दिवसांपूर्वी कलशारोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा झालेला आहे. विठ्ठल व रुक्मिणी मातेची रेखीव दगडी मुर्ती बसविण्यात आली आहे. या दोन्ही मुर्तींचे माप घेऊन उद्योजक नवनाथ घुले यांनी चांदीचे आकर्षक मुकुट बनवून घेतले व आज ते बसविण्यात आले.
पहाटेच्या भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. महिलांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. पोलीस पाटील हभप दत्ता महाराज सणस यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सणसनगर च्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने नवनाथ घुले व त्यांच्या परिवाराचा यथोचित सन्मान करण्यात आला.








