♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विद्येचं माहेरघर अन् विद्यार्थी जीव मुठीत धरून चालतात भिंतीवर! रस्त्यावर डोह असल्याने खडकवासला येथे विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही परवड;प्रशासनाचे दुर्लक्ष 

विद्येचं माहेरघर अन् विद्यार्थी जीव मुठीत धरून चालतात भिंतीवर! रस्त्यावर डोह असल्याने खडकवासला येथे विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही परवड;प्रशासनाचे दुर्लक्ष 

 

खडकवासला: खडकवासला धरणामागील कालव्यावर असलेल्या पुलावर डोह साचलेला असल्याने विद्यार्थ्यांची परवड होत असून त्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून कालव्याच्या भिंतीवरुन चालत जावे लागत आहे. या ठिकाणी सातत्याने पाण्याचा डोह साचलेला दिसतो मात्र पालिकेच्या पथ विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. परिणामी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

खडकवासला धरणामागे धरणामागे कालव्यावर असलेला पूल अत्यंत अरुंद आहे. एकावेळी एकच चारचाकी वाहन या ठिकाणाहून जाते. पुलावर खड्डा तयार झालेला असल्याने व दोन्ही बाजूंना चढ असल्याने थोडा पाऊस आला तरी या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे पायी ये-जा करणाऱ्यांना कसरत करावी लागते. त्यातच वाहनांची वर्दळ असल्याने पायी चालायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या रस्त्यावरुन रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय खडकवासला येथे शेकडो विद्यार्थी पायी ये-जा करतात. या ठिकाणी असलेल्या पाण्यामुळे कालव्याच्या भिंतीवरुन विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. कालवा भरुन वाहत असल्याने एखाद्या विद्यार्थ्याचा पाय घसरून त्यात पडल्यास जबाबदार कोण? विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षणासाठी सुरू असलेली ही परवड शासन आणि प्रशासनाच्या आब्रुची रक्तरं वेशीवर टांगणारी आहे.

“अनेक वेळा या कामासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. अपघात होण्याच्या अगोदर काम करुन घेण्यात यावे.” सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.

“सदर ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.” नेहा कोलते, कनिष्ठ अभियंता,पथ विभाग पुणे मनपा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles