
नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) सर्जिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ नितीन नलावडे यांची निवड; महाराष्ट्र राज्य संघटनेचे बनले पहिले अध्यक्ष
नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) सर्जिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ नितीन नलावडे यांची निवड; महाराष्ट्र राज्य संघटनेचे बनले पहिले अध्यक्ष
पुणे: नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशन सर्जिकल सोसायटीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ नितीन नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. असोसिएशनच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडून नुकतीच ही निवड जाहीर करण्यात आली आहे. डॉ नितीन नलावडे हे मागील सुमारे तीस वर्षांपासून पुणे सिंहगड रोड परिसरात उत्कृष्ट सर्जन म्हणून रुग्णसेवा करत आहेत.
देशभरातील सर्जनची व्यापक संघटना असलेल्या नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशन सर्जिकल सोसायटीच्या कार्यकारीणीने यावर्षीपासून पहिल्यांदाच राज्य स्तरावर संघटनेची कार्यकारिणी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य सर्जिकल सोसायटीची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. राज्यभरातील ख्यातनाम सर्जनचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
डॉ नितीन नलावडे, पुणे(अध्यक्ष), डॉ जगदीश देशमुख,धुळे (उपाध्यक्ष), डॉ प्रमेय ढगे, नागपूर (सचिव), डॉ सायली देसाई, कोल्हापूर (सहसचिव), डॉ जयदीप सोमवंशी,नाशिक (सहाय्यक सचिव), डॉ विपीन टोंगळे, अमरावती (खजिनदार), डॉ संदिप निकम, सातारा (संघटक) व डॉ चंद्रकांत देवसरकर, नांदेड, डॉ अंकिता, छत्रपती संभाजी नगर, डॉ नितीन बिस्वास, चंद्रपूर, डॉ पंकज गुप्ता, अकोला, डॉ संतोष घुगे, जिंतूर, डॉ विनोद चौगुले, कोल्हापूर आणि डॉ उषा चुनाडे, पंढरपूर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार व आधुनिक तंत्रज्ञानानुसार राज्यभरातील सर्जनच्या गरजा समजून घेऊन उत्कृष्ट रुग्णसेवा देण्यासाठी येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याची माहिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ नितीन नलावडे यांनी दिली.








