♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

झाडाच्या फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा; समोरुन आलेले वाहन दिसत नसल्याने अनेक अपघात; खडकवासला गाव ते DIAT रस्त्यावरील स्थिती 

झाडाच्या फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा; समोरुन आलेले वाहन दिसत नसल्याने अनेक अपघात; खडकवासला गाव ते DIAT रस्त्यावरील स्थिती 

 

खडकवासला: मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे खडकवासला ते DIAT पर्यंतच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. झाडाच्या फांद्यांमुळे समोरुन आलेले वाहन दिसत नसल्याने या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या धोकादायक फांद्या तातडीने तोडून घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

खडकवासला गावापासून पुढे DIAT पर्यंत पुणे पानशेत मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या आलेल्या आहेत. या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉक साठी मोठ्या प्रमाणात नागरिक जातात. तसेच सुट्टीच्या दिवशी सायकलींग साठी पुणे शहरातून नागरिक येतात. सिंहगड, पानशेत भागातील नागरिकही कामानिमित्त दररोज या रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसरात्र वर्दळ सुरू असते.

दोन्ही बाजूंनी झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या असल्याने नागरिकांना येजा करताना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी नागरिक रस्त्याच्या मधून ये-जा करत असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. तसेच या फांद्यांमुळे समोरुन आलेल्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पालिकेच्या उद्यान विभागाशी याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या माध्यमातून संपर्क साधला असता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

 

“फांद्या रस्त्यावर आल्याने ये-जा करताना अडचण येत आहे. एक दिवस चालत असताना अचानक मागून आलेल्या दुचाकीने पायाला धडक दिली होती. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. संबंधित प्रशासनाने अशा ठिकाणांची पाहणी करुन वेळच्या वेळी झाडांच्या फांद्या तोडून घेणे आवश्यक आहे.” शेखर सखाराम मते, नागरिक खडकवासला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles