♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

IMPACT:अन्नत्याग आंदोलन करु नका आदिवासी कातकरी नागरिकांना कागदपत्रे देण्याची लेखी हमी देतो म्हणत हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी तारखाही निश्चित केल्या; जागा देण्यासंदर्भातही तातडीने संयुक्त बैठकीचे आयोजन; लेखी आश्वासन दिल्याने अन्नत्याग आंदोलन स्थगित

IMPACT:अन्नत्याग आंदोलन करु नका आदिवासी कातकरी नागरिकांना कागदपत्रे देण्याची लेखी हमी देतो म्हणत हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी तारखाही निश्चित केल्या; जागा देण्यासंदर्भातही तातडीने संयुक्त बैठकीचे आयोजन; लेखी आश्वासन दिल्याने अन्नत्याग आंदोलन स्थगित

 

पुणे: देशाच्या स्वातंत्र्याला तब्बल 78 वर्षे पूर्ण झाले तरी आदिवासी कातकरी नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार मिळालेले नसल्याने द इन्वेस्टीगेशन एक्सप्रेसच्या पुढाकाराने स्वातंत्र्य दिनी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत अन्नत्याग ग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. खडकवासला व सिंहगड परिसरातील शेकडो आदिवासी नागरिक या आंदोलनात सहभागी होणार होते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या उत्तम नगर पोलिसांनी आंदोलन होणार असल्याबाबतचे पत्र तहसीलदार, प्रांत व आदिवासी विकास विभागाला पाठविल्यानंतर हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

तहसीलदार किरण सुरवसे यांनी द इन्वेस्टीगेशन एक्सप्रेसशी संपर्क साधून सांगितले की,”आपण तातडीने याबाबत बैठकीचे आयोजन करून सकारात्मक तोडगा काढू व आवश्यक ती सर्व कामे विना विलंब करून घेऊ.” त्यानुसार तहसीलदार किरण सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे, महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे, महसूल सहाय्यक दत्ता केंद्रे, निलेश बोरुडे, विमलबाई वाघमारे, नीरा वाघमारे, माया पवार, नवनाथ घुले व प्रशांत हगवणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला.

 

आधार कार्ड व जातीचे दाखले तयार करण्यासाठी

•कोंढवेधावडे मंडळातील गावांसाठी 19 व 20 ऑगस्ट 2025 रोजी कॅम्प.

•खेडशिवापूर महसुली मंडळातील गावांसाठी 19 व 20 ऑगस्ट रोजी कॅम्प

•खडकवासला महसुली मंडळातील गावांसाठी 21 व 22 ऑगस्ट रोजी कॅम्प.

•खानापूर महसुली मंडळातील गावांसाठी 25 व 26 ऑगस्ट रोजी कॅम्प.

•डोणजेसाठी 28 ऑगस्ट रोजी कॅम्प

 

जागा उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन 

एनडीए बाहुली रस्त्यालगत खडकवासला धरणामागे पाटबंधारे विभागाची अनेक एकर जागा पडून आहे. यातील काही जागा आदिवासी कातकरी नागरिकांच्या कायमस्वरूपी निवासासाठी शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलनाच्या निवेदनातून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता, हवेली गटविकास अधिकारी, हवेली तहसीलदार, हवेली उपविभागीय अधिकारी, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित 

महसुली मंडळातील गावांमध्ये असणाऱ्या सर्व आदिवासी कातकरी नागरिकांची आधार नोंदणी करून घेणे, त्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे देणे याबाबत मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत याकडे तहसीलदार किरण सुरवसे यांचे लक्ष वेधण्यात आल्यानंतर त्यांनी याबाबत मंडळ अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचे स्पष्ट सांगितले.

 

अन्नत्याग आंदोलन स्थगित 

तहसीलदार किरण सुरवसे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्यांबाबत लेखी स्वरुपात उत्तर दिल्याने व मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी तारखा निश्चित करून अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने स्वातंत्र्य दिनापासून नियोजित असलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles