
उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे स्तोम; कारवाई न झाल्यास द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’करणार ठिकाणांसह ग्राऊंड रिपोर्टची मालिका
उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे स्तोम; कारवाई न झाल्यास द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’करणार ठिकाणांसह ग्राऊंड रिपोर्टची मालिका
उरुळी कांचन(प्रतिनिधी): पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. सातत्याने माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होत असताना कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तातडीने कारवाई न झाल्यास द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ठिकाणांसह ग्राऊंड रिपोर्टची मालिका प्रसिद्ध करुन याबाबत भांडाफोड करणार आहे.
उरुळी कांचन सह हद्दीतील गावांमध्ये जुगार मटका क्लब राजरोसपणे सुरू आहेत. गावठी दारू,ताडीचे गुत्ते सुरू आहेत. गांजा, गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. याबाबत यापूर्वी विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मात्र तात्पुरती कारवाई करुन दिखावा करण्याच्या पलीकडे काहीही झाले नाही. परिणामी अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे.
पोलीसांकडून अभय मिळत असल्याने अवैध धंदेवाले निर्ढावले आहेत. या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे कायमचे उध्वस्त करणे आवश्यक आहे. अवैध धंदे वाले आणि त्यांना अभय देणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत जर पुढील काही दिवसांत कारवाई झाली नाही तर द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ठिकाणांसह ग्राऊंड रिपोर्टींग करुन या रॅकेटचा भांडाफोड करणार आहे.








