♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Traffic Jam:खडकवासला धरण चौक आणि किरकटवाडी फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा; खडकवासला धरण चौकात एकही पोलीस कर्मचारी नाही 

खडकवासला: रविवारची सुट्टी असल्याने खडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. परिणामी परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांमुळे खडकवासला धरण चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. खडकवासला धरण चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचा एकही पोलीस कर्मचारी नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. तसेच खडकवासला धरण चौपाटी परिसरातही नागरिकांनी अत्यंत बेशिस्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

खडकवासला धरण चौकातून कसाबसा मार्ग काढून पुढे आलेल्या नागरिकांना किरकटवाडी फाटा येथे अडकून पडावे लागत आहे. नांदोशी-सणसनगर येथील मनन आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी हजारो वाहनांतून नागरिक आलेले आहेत. त्यांच्या सोयीसाठी किरकटवाडी फाटा येथे बाऊन्सर तैनात करण्यात आलेले असून मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबवून ते सदर कार्यक्रमावरुन परत जाणाऱ्या वाहनांना मार्ग काढून देत आहेत. किरकटवाडी पाण्यापासून आत गावठाणाकडे या कार्यक्रमावरुन परतणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याने स्थानिकांची गैरसोय होत आहे.

किरकटवाडी फाट्यावर मात्र एक पोलीस कर्मचारी व एक ट्राफीक वार्डन दिसून आला. रविवारचा दिवस असताना मोठ्या प्रमाणात पर्यटक या भागात येतात याची माहिती असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हवेली पोलीसांनी कोणतेही नियोजन केल्याचे दिसून आले नाही. तसेच मुख्य रस्त्यावर गर्दी असताना त्याच वेळी मनन आश्रमाकडून वाहने सोडली जातात. अनेक वेळा आवाज उठवूनही या आश्रमाने आपल्या नियोजनात कधीही बदल केला नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles