♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या; अनेक वर्षांच्या प्रतिक्षेत पुन्हा न्यायालयीन प्रक्रीयेची भर पडल्याने भवितव्य अधांतरी; यात आमचा काय दोष? म्हणत 645 शिक्षकांचे शिक्षण आयुक्तांना निवेदन 

पुणे: डीएड, बीएड ची पदवी घेऊन वर्षानुवर्षे खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये तुटपुंज्या पगारावर शिक्षक म्हणून नोकरी करत कधी ना कधी आपल्याला सरकारी नोकरी मिळेल या आशेवर असलेल्या हजारो उमेदवारांना अखेर फेब्रुवारी महिन्यात पवित्र पोर्टल च्या माध्यमातून निवड यादीत स्थान मिळाले. यातील बहुतांश शिक्षक शासनाच्या वेगवेगळ्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सेवेत रुजूही झाले आहेत. मात्र ज्या उमेदवारांची रयत शिक्षण संस्थेत निवड झाली त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील अद्याप झालेली नाही. रयत शिक्षण संस्थेच्या भरती प्रक्रीयेबाबत वाद सुरू असल्याने पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या 645 उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. गुणवत्ता यादीत येऊन जर आमची नियुक्ती रखडत असेल तर यात आमचा काय दोष? असे म्हणत या उमेदवारांच्या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना निवेदन देऊन तातडीने याबाबत मार्ग काढण्याची मागणी केली आहे.

2017 नंतर तब्बल 7 वर्षांनी होऊ घातलेली शिक्षक भरती अनेक अडचणींचा सामना करत फेब्रूवारी 2024 मध्ये निवड याद्या लागुन अंतिम टप्प्यात आली. TAIT परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारे 645 भावी शिक्षक रयत शिक्षण संस्थेमध्ये निवडले गेले , परंतु पदरी पडली ती घोर निराशा. कारण निवड्याद्या जाहीर होण्या अगोदरच रयत संस्थेतील शिक्षक भरतीवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती आणली. आजपर्यंत चार महिने उलटुन गेले तरीही न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाण्याचे चिन्ह नाहीत. त्यात लोकसभा आचारसंहितेची भर व कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या, त्यामुळे हे सर्वात जास्त गुण मिळवून निवड झालेले उमेदवार अक्षरशः निराशेच्या अंधारात ढकलले गेले आहेत. आयुक्तांना 2 वेळा निवेदने दिली गेली परंतु प्रकरण न्याय प्रविष्ट असल्या कारणाने वाट पहावी लागेल असे सूतोवाच मिळाले. मध्यंतरी कोर्टाच्या 3 तारखा उलटुन देखील यावर तोडगा निघालेला नाही. बरोबरचे इतर आस्थापनांचे उमेदवार हे 2 महिन्यांपूर्वीच कामावर रूजू देखील झाले, परंतु जास्त गुण असूनही हे उमेदवार अद्याप घरी, यात त्यांची चुक काय? या विचारांनी व स्थगिती उठण्याची अनिश्चितता यामुळे हे भावी शिक्षक अजुनच जास्त खचले आहेत.

 

निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्या 

•रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आत कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीसाठी तुमच्या स्तरावरून प्रयत्न करावेत.

•रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात यावी.

• आयुक्त कार्यालयाद्वारे रयत शिक्षण संस्थेच्या नियुक्ती संदर्भात होत असलेल्या विलंबाबाबत विचारणा करुन  न्युज बुलेटिन द्वारे उमेदवारांचा संभ्रम दूर करावा.

• न्यायालयाची रयत शिक्षण संस्थेच्या भरती प्रक्रियेवर स्थगिती असल्यास ती उठवण्याच्या संदर्भात सरकारी वकील आणि रयतच्या वकिलांशी आयुक्त साहेबांनी चर्चा करुन न्युज बुलेटिन द्वारे माहितीप्र सिध्द करावी.

• शासकीय तसेच निम-शासकीय आस्थापनासाठी विना मुलाखत शिक्षक भरती 2022 न्यायालयाच्या आदेशानुसार होत असताना केवळ रयत शिक्षण संस्थेच्या भरती प्रक्रियेवरच न्यायालयाद्वारे स्थगिती दिलेली असल्यास हे उचित ठरत नाही तरी स्थगिती तात्काळ उठवण्यासाठी प्रयत्न करावेत.

•नियुक्तीस 1 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी किंवा जेवढा अधिकचा कालावधी लागेल तेवढा कालावधी शिक्षण सेवक कालावधी म्हणून गृहीत धरण्यात यावा.

•निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नसताना कन्वर्टेड फेरीसाठी D.Ed किंवा B.Ed अहर्ता असणारे Maha TET किंवा CTET पात्र अशा सर्व इच्छुक उमेदवारांना कन्वर्टेड फेरी करीता लॉगिनला “ऐच्छिक कन्वर्टेड टॅब” उपलब्ध करुन देण्यात यावा.

•सदर नियुक्ती प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवाय पुढील गुणवत्ता फेरी व यादी जाहीर करण्यात येऊ नये.

•पवित्र पोर्टल मार्फत विना मुलाखत निवड यादी दिनांक 25.02.2024 रोजी प्रसिद्ध होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी उलटला असून आज पर्यंत रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांना कोणतीच सूचना न मिळाल्याने उमेदवारांचा संभ्रम वाढतो आहे. तरी माननीय आयुक्त साहेबांनी उमेदवारांच्या मानसिकतेचा विचार करुन लवकरात लवकर नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न करावेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles