♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

DG Insignia:पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, मंगेश भगत यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर; 1 मे रोजी होणार सन्मान 

पुणे: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत व पोलीस कर्मचारी मंगेश भगत यांना पोलिस महासंचालक पदक (DG Insignia) जाहिर झाले आहे. 1 मे रोजी होणाऱ्या सोहळ्यात या दोघांचाही सन्मान करण्यात येणार आहे. अभिजीत सावंत यांना उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व संवेदनशील गुन्ह्यांतील तपासा बद्दल तर पोलीस कर्मचारी मंगेश भगत यांना कबड्डी खेळात उत्कृष्ट कामगिरी करुन पोलीस दलाची मान उंचावल्या बदल हे पदक जाहीर झाले आहे.

2015 साली पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झालेले अभिजित सावंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. अगोदर सांगली व सध्या पुणे ग्रामीण येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आतापर्यंत सावंत यांना तब्बल 150 पेक्षा जास्त बक्षिसे मिळालेली आहेत. पोलीस महासंचालक पदक हे आपल्या कामाची पोचपावती असून यापुढे अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरणा असल्याची भावना पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांनी व्यक्त केली आहे.

खडकवासला धरणालगत असलेल्या बहुली या गावातील असलेले पोलीस कर्मचारी मंगेश भगत यांनी पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात सुमारे सत्तर अवैध शस्त्रे पकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना भगत यांनी आपली कबड्डी खेळाची आवड जोपासली आहे. उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असलेल्या भगत यांनी कबड्डीच्या माध्यमातून पोलीस दलाची मान उंचावली आहे. त्याबद्दल भगत यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. सावंत आणि भगत या दोघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles