♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खा. सुप्रिया सुळेंच्या विजयाने खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा

सिंहगड: देशभरात सर्वात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांनी तब्बल दिड लाख मतांनी चौथ्यांदा बाजी मारली आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. दुसऱ्या बाजूला आपलाच उमेदवार निवडून येईल असे ठासून सांगणाऱ्या महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तसेच सत्ताधारी भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित ताकद, सत्तेच्या सावलीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांमुळे ही निवडणूक खा. सुप्रिया सुळे यांना जड जाईल असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्ष निकालामध्ये मात्र असा कोणताच परिणाम दिसलेला नाही.
पोस्टल मतदान वगळता इतर जवळपास सर्वच फेऱ्यांमध्ये खा. सुप्रिया सुळे या आघाडीवर दिसत होत्या. तब्बल दिड लाख मतांनी खा. सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखला आणि अशक्य वाटणारा विजय सहज संपादन केला. पदाधिकारी सोडून गेलेले असले तरी निकराने प्रचारात सहभागी झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर मोठा जल्लोष केला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles