♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Khadakwasla voting: किरकटवाडीत मतदानासाठी रांगा; भर उन्हातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मतदारांच्या सोईसाठी प्रशासनाकडून उपाययोजना 

किरकटवाडी: बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील किरकटवाडी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. सध्या भर उन्हातही नागरिक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येताना दिसत आहेत. मतदारांच्या सोईसाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या असून सावलीसाठी मंडपही उभारण्यात आलेला आहे.

किरकटवाडी गावात एकूण 8699 इतकी मतदारसंख्या आहे. आपापल्या सवडीनुसार मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येत असून प्रमुख उमेदवारांच्या वतीने मतदार यादीतील नाव शोधून चिठ्ठी देण्यासाठी बूथ उभारण्यात आलेले आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नागरिकांची गर्दी दिसत असली तरी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळच्या सुमारास मतदारांनी गर्दी केल्यानंतर दुपारी गर्दी कमी दिसेल असे बोलले जात होते परंतु भर उन्हातही नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदारांचा प्रतिसाद पाहता यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारी पेक्षा यावेळी किरकटवाडी येथील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार असे दिसून येत आहे. किरकटवाडीतील मतदार कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकतात हे मात्र 4 जून नंतरच स्पष्ट होणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles