♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘स्थानिक’ पोलीसांची उडाली झोप; थेट लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्य साई कार्तिक यांचे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर छापे

पुणे: “स्थानिक” पोलीसांच्या आशिर्वादाने हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर हवेली पोलीस स्टेशन किंवा स्थानिक गुन्हे शाखा नव्हे तर थेट लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्य साई कार्तिक यांच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली आहे. आयपीएस सत्य साई कार्तिक यांनी केलेल्या या कारवाईमुळे ‘स्थानिक’ पोलीसांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.

काल रात्री उशिरा लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्य साई कार्तिक यांचे पथक हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडकले. खानापूर परिसरातील काही अवैध धंद्यांवर या पथकाने कारवाया केल्याची बातमी हद्दीत वाऱ्यासारखी पसरली. यामुळे अवैध धंदेवाल्यांची पळापळ झाली. अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई झाल्याने ‘चालक’, ‘मालक’ यांना कानोकान खबर लागली नाही.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी थेट लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सांगून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाया केल्याने ‘स्थानिक’ पोलीसांचे धाबे दणाणले आहेत. ‘तसेच सर्व काही बंद आहे’ हे रिपोर्ट खोटे असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे.

प्रेस नोट बनवली नाही!

एरव्ही आपली पाठ थोपटून घेण्यासाठी घाईघाईत प्रेस नोट काढून बातम्यांसाठी धावपळ करणारे हवेली पोलीस स्टेशन यावेळी मात्र थंड पडल्याचे दिसून आले. नेहमी प्रेस नोट टाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता प्रेस नोट तयारच केली नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे नेमकी किती अवैध धंद्यांवर कारवाई झाली, कोणाला अटक झाली, काय काय मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत तपशील समजू शकले नाहीत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles