♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला-किरकटवाडी शीव रस्ता:प्रत्यक्षात काम 100 फूटही पूर्ण नसताना अधिकाऱ्यांचा दावा 200 मीटर काम झाल्याचा; कासवालाही लाजवेल अशी कामाची गती आणि सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त

खडकवासला-किरकटवाडी शीव रस्ता:प्रत्यक्षात काम 100 फूटही पूर्ण नसताना अधिकाऱ्यांचा दावा 200 मीटर काम झाल्याचा; कासवालाही लाजवेल अशी कामाची गती आणि सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त

 

किरकटवाडी: मागील अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेल्या आणि तब्बल चार भूमिपूजन सोहळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेल्या खडकवासला व किरकटवाडी या रस्त्याच्या कामाबाबत सद्यःस्थितीतही अनिश्चितता दिसत असून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामामुळे दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून रहिवासी हैराण झाले आहेत. त्यातच पालिकेच्या पथ विभागाचे उप अभियंता नरेश रायकर यांचे 200 मीटर काम पूर्ण झाल्याचे म्हणणे वर्तमान पत्रांमध्ये छापून आल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.

शीव रस्त्याच्या कामासाठी पालिकेकडून पहिल्या टप्प्यात सुमारे दीड कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे पन्नास लाख असा सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर झालेला असून काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने खोदकामामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कामाची गतीही अत्यंत संथ असल्याने काम पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता दिसत आहे. त्यातच उप अभियंता नरेश रायकर यांनी वर्तमान पत्रांमध्ये अत्यंत बेजबाबदार प्रतिक्रिया देत 200 मीटर काम पूर्ण झाल्याचे निराधार विधान केले आहे. तसेच डिसेंबर महिन्यात काम पूर्ण होईल असेही म्हटले आहे. प्रत्यक्षात रस्त्याच्या एकाच बाजूचे केवळ 100 फूटही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत उप अभियंता नरेश रायकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

 

ठेकेदार काम सोडून जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदार या रस्त्याच्या कामातील अडथळ्यांमुळे हे काम अर्धवट सोडून देण्याच्या मानसिकतेत आहे. भागातील एका नेत्याकडे संबंधित ठेकेदाराने तसे बोलून दाखवले आहे. तसे झाल्यास या रस्त्याचे घोंगडे पुन्हा भिजत पडणार आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून वेळेत याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

 

“दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असून खुप त्रास सहन करावा लागत आहे. कामाची गती अत्यंत संथ आहे. अधिकारी 200 मीटर काम झाल्याचे कोणत्या आधारावर सांगत आहेत? अधिकारी नागरिकांना मूर्ख समजतात का?” अमेय चव्हाण, रहिवासी.

 

“ठेकेदार आणि अधिकारी यांनी नागरिकांची समस्या गांभीर्याने समजून घेणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागलेले आहेत. कारणं न सांगता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून तातडीने काम पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.” सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles