♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘माझं प्रमोशन जवळ आलं आहे तू नाव घेतलं तर अडचण होईल’……दोन तास मगरीचे आश्रू ढाळून सहानुभूती… ‘त्याला’ दया आली पण तेथेच घात झाला!

‘माझं प्रमोशन जवळ आलं आहे तू नाव घेतलं तर अडचण होईल’……दोन तास मगरीचे आश्रू ढाळून सहानुभूती… ‘त्याला’ दया आली पण तेथेच घात झाला!

संपादकीय: एका व्यक्तीचे एका ठिकाणी लाखो रुपये अडकलेले असतात. पैसे मिळावेत म्हणून तो त्याच्या परिने शक्य ते प्रयत्न करत असतो परंतु यश मिळत नाही. एक पोलीस ते काम घेतो. तुझे पैसे काढून देतो पण त्या बदल्यात दीड लाख द्यावे लागतील अशी डील फायनल होते आणि त्या डील नुसार कामही सुरू होते. ज्याचे पैसे अडकलेत त्याला वाटते आपले पैसे आता मिळून जातील.
दरम्यान ज्या व्यक्तीने खोटे आमिष दाखवून पैसे घेतलेले असतात ती व्यक्तीही पोचलेली असते. एक दिवस ती व्यक्ती थेट मोठ्या साहेबाकडे जाते आणि रंगवून कहाणी सांगते. साहेबांचा त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि मग काय साहेब खालच्यांना झापतात. त्या व्यक्तीवर प्रचंड अन्याय झालाय असं समजून तातडीने कारवाई करण्याचा आदेश जातो.
ज्याचे पैसे अडकलेले असतात त्याला याबाबत काही खबर नसते. एक दिवस त्याला ज्याने त्याचे काम घेतलेय त्याचा फोन येतो. त्याला वाटतं आपलं काम घेणारा बोलवतोय मग लगेच गेलं पाहिजे. जातो तर काय त्याच्यावर बदाबद मार पडतो. हे का होतंय हे त्याला कळतं न कळतं तोपर्यंत साहेबांनी हात धूऊन घेतलेला असतो. कदाचित वरच्या साहेबांनी झापल्याचा सगळा राग निघत होता.
ज्याचे पैसे अडकलेले असतात तो अचानक बसलेल्या मारामुळे हिरमुसलेला असतो. काय करायचं त्याला सूचत नसतं. तो टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतो. त्याने हे पाऊल उलल्यानंतर पोलीसांची पळापळी होते. तो अनेकांची नावं घेत असतो.
यातील एक नाव ज्याने दीड लाखाला त्याचं काम ठरवलेलं असतं त्याचं असतं. आपलं नाव आल्यामुळे आता चौकशी लागते काय? कारवाई होते काय? आता कसं होणार? असे प्रश्न त्या डीलरला पडायला लागले. मग काय तो रडत त्या व्यक्तीकडे गेला. दोन तास रडत बसला. माझं प्रमोशन आलं आहे, तू नाव घेतलं तर माझं प्रमोशन जाईल. मी तुला पाहिजे ती मदत करतो फक्त माझं नाव तेवढं घेऊ नको असं म्हणत गयावया करत होता. त्याचे नातेवाईकही त्या व्यक्तीकडे तेवढं एक नाव घेऊ नको म्हणून विनंती करत होते.
या सगळ्यांच्या विनवणीमुळे व त्या तथाकथित डीलरच्या मगरीच्या आश्रुंना तो व्यक्ती भुलला आणि सहकार्य करायला तयार झाला. पण तेथेच घात झाला. तेथून पुढे कारस्थान रचण्यास सुरुवात झाली. आमच्या विरोधात जातो काय तुला दाखवतो म्हणत यंत्रणा कामाला लागली. दरम्यान तरीही त्या डीलरने एक दीवस फोन केला. तुझ्याकडे काय कागद आहेत, पोच पावत्या आहेत त्या घेऊन ते. आपण त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन टाकू. सगळं फोनवर बोलता येत नाही. तू ये मग सगळं सांगतो. या व्यक्तीला वाटलं डीलर आपल्या बाजूने आहे परंतु तो त्याचा गैरसमज होता. डीलर याचा नव्हताच मुळात कधी तो केवळ पैशांचा होता!

(टिप: ही कथा काल्पनिक आहे. वास्तविक घटना, व्यक्ती, व्यक्ती विशेष यांचा या घटनेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. जर कोणाला ही कथा आपल्याशी निगडित आहे असं वाटत असेल तर तो त्याच्या कर्माचा दोष समजावा.)

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles