♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मार्फत नवभारत हायस्कूल शिवणे, पुरंदरेश्वर विद्यालय खामगाव छत्र व न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ येथे सिलिंग फॅनचे वितरण

पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे येथे बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड चाकण यांच्या वतीने सिलिंग फॅनचे वितरण बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड चाकणचे प्लांट हेड देविदास जोशी, इंटरनल ऑडिटर संभाजी कुदळे व बजाज इलेक्ट्रिकल्सचे सुरक्षा अधिकारी मेजर पांडुरंग यादव व टीमच्या हस्ते करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ येथे फॅन भेट देताना मान्यवर.

त्याचप्रमाणे सिंहगड परिसरातील पानशेत भागशाळा अंतर्गत पुरंदेश्वर विद्यालय खामगाव छत्र कोंडगाव, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ या विद्यालयाची गुणवत्ता, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा व भौगोलिक परिस्थिती, विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेत असलेले शिक्षण, पत्र्याच्या शालेय खोल्या,ऐन उन्हाळ्यातील उच्चांकी पातळीवर पोचलेले तापमान या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने बजाज इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सीएसआर फंडामधून विद्यालयास सिलिंग फॅन देण्यात आले. तीन शाळांसाठी एकूण एक लाख वीस हजार रूपयांचे सिलिंग फॅन मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील सिलिंग फॅन नुकतेच शाळेत सुपूर्द करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी,विद्यालयाचे प्राचार्य फापाळे पी.एन,उपप्राचार्य साबळे एस बी, पर्यवेक्षक ,कुंभार डी.बी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी बजाज प्रायव्हेट लिमिटेड चे वरिष्ठ अधिकारी अजय खरे, विभागीय अधिकारी देविदास जोशी,एच आर प्रमुख आण्णासाहेब जाधव, सीएसआर टीमचे पूजा कासार ,शामराव निंबाळकर व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles