♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Live Bomb:एनडीए-बहुली रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असताना आढळला जीवंत बॉंब; उत्तमनगर पोलीस व बॉंब शोधक पथकाच्या कारवाईने अनर्थ टळला 

पुणे: उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एनडीए- बहुली रस्त्यावरील कमळजाई मंदिराजवळ काम सुरू असलेल्या पुलाच्या खोदकामादरम्यान जीवंत हॅंड ग्रेनेड आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. माहिती मिळाल्यानंतर तातडीने उत्तमनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. बीडीडीएस पथकाला बोलवून सदर हॅंड ग्रेनेड निकामी करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कमळजाई मंदिराजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला लष्कराची हद्द असून हा संपूर्ण परिसर अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. रात्रंदिवस येथे शस्त्रधारी सैनिक बंदोबस्तासाठी तैनात असतात. येथूनच जवळ हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलाचे काम सुरू आहे. काल दि. 9 मे रोजी खोदकाम सुरू असताना कामगारांना बॉंब सदृष वस्तू दिसून आली. याबाबत तातडीने उत्तमनगर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार केंद्रे, एल आय बी अंमलदार बिटले, पोलीस हवालदार बनसोडे घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिसर निर्मनुष्य करण्यात आला व बीडीडीएस पथकाला पाचारण करण्यात आले. वाहतूक थांबवून निर्मनुष्य ठिकाणी संबंधित हॅंड ग्रेनेड निकामी करण्यात आले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles