♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

माहिती मिळताच अवघ्या काही वेळात महावितरण कर्मचाऱ्यांनी खडकवासला येथे विजेच्या तारांवर पडलेले झाड हटविले; संभाव्य धोका टळल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान 

खडकवासला: आज सकाळी खडकवासला येथील संत रोहिदास नगर परिसरातील एका वाळलेल्या झाडाच्या खोडाला अज्ञाताने आग लावून दिली होती. खोड जळाल्यानंतर ते जाड विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारांवर कोसळले. खडकवासला येथील जागृत नागरिक उमेश गोऱ्हे यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने तातडीने महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांच्याशी संपर्क साधून तारांवर झाड पडलेले असल्याची माहिती दिली. खडकवासला बाह्यवळण रस्त्याला लागून हा विजेचा खांब असल्याने तार तुटल्यास मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांनी तातडीने कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कलढोणे, सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी सिद्धेश्वर मोरे, संतोष कोथळकर व महावितरणच्या ग्रामीण विभागाचे कर्मचारी चेतन शिंदे, सचिन जावळकर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन विजपुरवठा बंद करून तारांवर पडलेले झाड काढून घेतले. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने संभाव्य दुर्घटना टळल्याने खडकवासला येथील संत रोहिदास नगर परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles