♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन्ही मुख्य उमेदवारांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केलेले दिसत आहे 

पुणे (खडकवासला): महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत असून दोन्ही बाजूंनी सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर,भोर-वेल्हा(राजगड)- मुळशी व खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येत असले तरी यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दोन्ही उमेदवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

शहरी व ग्रामीण असा संमिश्र विभागणी असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा मागील काही निवडणूकांपासून भारतीय जनता पक्षाला अनुकूल असल्याचे दिसून आलेले आहे. मागील दोन लोकसभा निवडणूकांचा अनुभव पाहता रासपचे महादेव जाणकर व भाजपा च्या कांचन कुल यांना सरासरी पन्नास हजारांच्या वर मताधिक्य खडकवासला विधानसभा मतदार संघाने दिलेले आहे. महत्वाचे म्हणजे हे दोन्हीही उमेदवार खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी पूर्ण नवखे होते आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या भागात या उमेदवारांचे कोणतेही काम नव्हते. असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांना या दोन्ही उमेदवारांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात लक्षणीय पिछाडीवर ठेवले. अर्थात हे मतदान स्थानिक भाजपा नेत्यांमुळे मिळाले असे म्हणणे अर्थ शुन्य ठरेल कारण तसे असते तर मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसता तर चित्र वेगळे दिसले असते.

याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदार हे उमेदवार पाहून नाही तर पक्ष पाहून लोकसभा निवडणुकीत मतदान करत आहेत. ही बाब महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आलेली आहे. याचा विचार करुन दोन्ही उमेदवारांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात जातीने लक्ष घालून सुक्ष्म नियोजन करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

खडकवासल्याचा थेट संबंध बारामतीशी?

दोन्ही उमेदवारांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे त्याचे मुख्य कारण आहे बारामती विधानसभा मतदारसंघ! बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांना सातत्याने मोठे मताधिक्य मिळालेले आहे. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हेच विरोधात असल्याने बारामतीचे मतदार पूर्वीप्रमाणेच मताधिक्य देणार की त्यात घट होणार याचा नेमका अंदाज लावणे सध्या कठीण आहे. त्यामुळे बारामतीत मताधिक्य घटले तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून तो फरक भरुन निघावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे प्रयत्नशील आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या या मोहिमेत त्यांना यावेळी कट्टर शिवसैनिकांची साथ मिळालेली आहे.

दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हेही खडकवासला विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना अपेक्षित साथ मिळाली नाही तर तो फरक खडकवासला विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक मताधिक्य मिळवून भरुन निघेल यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. निकाल काय लागेल हे आत्ताच जरी सांगणे कठीण असले तरी खडकवासला विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालात निर्णायक असेल हे मात्र नक्की आहे!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles