सोशल मीडियावर वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि अखेर ती सापडली
पुणे: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील नामांकित शाळेत शिकत असलेली ओवी प्रदीप राक्षे ही मुलगी बेपत्ता असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. स्मार्ट फोन वापरणाऱ्या पुणे आणि परिसरातील प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडियावर मुलगी बेपत्ता असल्याबाबत पोस्ट केली. प्रत्येक पालकाला काळजीत टाकणारी ही बातमी असल्याने सर्वजण आपापल्या परीने ओवीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते.
सायंकाळच्या सुमारास ओवीला वाघोलीत पाहण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलीस प्रशासनही युद्धपातळीवर ओवीचा शोध घेत होते. अखेर काही वेळापूर्वी ओवी रांजणगाव गणपती येथे सुरक्षित मिळून आल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मिडियाचा प्रभावी वापर झाल्याने ओवीचा शोध लागला आहे.