♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोहंमदी काझी यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

पुणे:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे, ता खेड, जिल्हा पुणे येथील आदर्श शिक्षिका मोहंमदी जाकीर काझी यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षिका) पुरस्कार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आला आहे . जिल्हा निवड समिती द्वारे त्यांची पुणे जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने अध्यक्ष दीपक चामे, उपाध्यक्षा मेघाराणी जोशी, सचिव सतीश कोळी, जिल्हा निवड समिती सदस्य सागर कांबळे, मोहन शिंदे , मनोज पांचाळ , किरण वाळके यांच्याद्वारे उपक्रमशील शिक्षिका मोहंमदी काझी यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षिका ) पुरस्कार निवड पत्र देण्यात अले . विविध छंद वर्ग , शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन , कोड लँग्वेज , विविध क्रीडा कौशल्य खेळ अशा अनेक उपक्रमातून त्यांच्या कार्याचा फायदा शिक्षण क्षेत्राला आणि भारताचे आधारस्तंभ असणाऱ्या भावी पिढीला होत आहे , त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थी , शिक्षक वृंद , शाळा, सर्वांनाच होत आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे 24मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, केंद्रप्रमुख नामदेव गायकवाड, मुख्याधापक सत्यवान लोखंडे, सरपंच अनिल गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश गावडे , सर्व सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी अशा सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles