♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Kirkatwadi accident: भरधाव कॉंक्रीट मिक्सरची उभ्या असलेल्या दुचाकीला धडक; प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण 

  1. पुणे: भरधाव वेगात आलेल्या कॉंक्रीट मिक्सरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याची घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास किरकटवाडी येथील मुख्य चौकात घडली. दुचाकीवरील महिलेने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने जीव वाचला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कॉंक्रीट मिक्सर अडवून ठेवले होते.
अपघातानंतर नागरिक संतप्त झाले होते

किरकटवाडी येथील महिला रस्त्याच्या कडेला दुचाकीवर थांबली होती. किरकटवाडी फाट्याच्या बाजूने भरलेला कॉंक्रीट मिक्सर (MH12TV1030) भरधाव वेगाने आला व विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील महिलेने प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने तिचा जीव वाचला आहे. या अपघातामुळे किरकटवाडी येथे रात्री अपरात्री चालणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविंद्र हगवणे यांनी 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर काही वेळात हवेली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

चालकाकडे परवाना नव्हता

परवाना सोबत नसताना अवजड वाहन चालवित असलेला चालक

पोलीस आल्यानंतर त्यांनी चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला असता परवाना गाडी मालकाकडे जमा असल्याचे चालकाने सांगितले. नियमानुसार वाहन चालविताना परवाना सोबत असणे आवश्यक असते मात्र या चालकाकडे परवाना नसल्याचे दिसून आले. पुढील कारवाईसाठी कॉंक्रीट मिक्सर पोलीस ठाण्याकडे नेण्यात आला असून रविंद्र हगवणे हेही तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles