♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस निरीक्षकांना हे दिसलं नाही का की पाहून न पाहिल्या सारखं केलं;हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘ओल्या धुलवडीचे’ व्हिडिओ व्हायरल

पुणे: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगी ‘ओली धुलवड’ आयोजित करण्यात आली होती. कालच याबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने बातमी प्रसिद्ध करुन पोलीसांचे लक्ष वेधले होते. या ओल्या धुलवडीचे व्हिडिओ आता व्हायरल झाले असून नशेत ‘झिंगाट’ झालेली तरुणाई बेधुंद होऊन थिरकताना दिसत आहे.

धक्कादायक म्हणजे दुपारच्या सुमारास हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित रिसॉर्टमध्ये गेले होते. पोलीस निरीक्षकांनी फेर’फटका’ मारला आणि निघून गेले. हजारोंच्या संख्येने मद्यधुंद होऊन थिरकत असलेली तरुणाई, रंगाने भरलेला जलतरण तलाव, उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेले मद्य, अल्पवयीन मुले-मुली असं काहीच कसं त्यांना दिसलं नाही की सर्व काही पाहून ‘ठरल्याप्रमाणे’ न पाहिल्यासारखं करुन साहेब निघून गेले?

ज्याअर्थी अद्याप याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही त्याअर्थी नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण देवाणघेवाण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाखो लिटर रंग मिश्रीत पाणी खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळले काय आणि राजरोसपणे अल्पवयीन मुलामुलींना मद्य व इतर नशेचे पदार्थ उपलब्ध करून दिले काय काहीही फरक पडत नाही. जेव्हा ‘कुंपणच शेत खातं’ तेव्हा कोण कोणावर कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles