♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हवेली पोलीसांच्या उपस्थितीतच ‘ओली धुलवड’;हजारो तरुण तरुणी ‘झिंगाट’

पुणे: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत ‘त्या’ रिसॉर्ट मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जंगी इव्हेंटचे आयोजन करण्यात आले असून चक्क हवेली पोलीसांच्या उपस्थितीतच ही ‘ओली धुलवड’ सुरू असून हजारो युवक-युवती ‘झिंगाट’ होऊन रंग खेळत आहेत.

खडकवासला धरणाचे प्रदुषण होऊ नये म्हणून दरवर्षी एका सामाजिक संटनेचे कार्यकर्ते भर उन्हात खडकवासला धरण चौपाटी जवळ खडा पहारा देतात. विरोधाभास म्हणजे काही अंतरावर असलेल्या या हॉटेलच्या लॉनमध्ये जी अगदी खडकवासला धरणाच्या पाण्याला लागून आहे तेथे हजारो तरुण-तरुणी बेधुंद होऊन रंग उधळत आहेत. हे सर्व रंग धुतल्यानंतर पाणी धरणात जाणार नाही तर कोठे जाणार?

काही वेळापूर्वी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे स्वतः या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांसह येऊन पाहणी करून गेले. पोलीसांनी फोटो, व्हीडिओ काढत आल्याआल्या स्टंट केला परंतु लगेच निघून गेले असे या इव्हेंट मध्ये सहभागी झालेल्या दोन तरुणांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यामध्ये अल्पवयीन मुले, मुलीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles