♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Letter to Ajit Pawar & Supriya Sule: खडकवासला येथील मतदाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांना खरमरीत पत्र

आदरणीय दादा,ताई आणी वाहिनी यांस नमस्कार…. आपला मतदार म्हणून लोकांच्या मनातील भावना लिहित आहे!

बारामती मतदारसंघ सध्या देशातील एक हॉटस्पॉट ठरतोय. इतर काही विशेष घडले नाही तर पद पवार कुटुंबातच राहणार आहे. गेल्या काही काळातील ‘कोलांट्या उड्या’ मतदार पाहतोय. यातील जनतेपेक्षा आपला वैयक्तिक स्वार्थ किती हेही मतदार पाहतोय!

दादा वहिनी आपल्या ‘पक्ष कार्यकर्त्या’ म्हणतात लग्न झालेल्या लेकीची माहेरी लुडबुड नको. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या तोंडी हे वाक्य वहिनी तुम्हीही खपवून घेता. दादा आपणही मला समजून माझा उमेदवार निवडा असे आम्हाला आवाहन करता. आमचे प्रतिनिधी तुम्ही होणार आहात की वहिनी…..?

ताई आपण मागे पर्स घेऊन कॅन्टीन मध्ये बसायचं वगैरे म्हणालात. आपले एक कार्यकर्ते इंग्लिश बोलावे लागेल म्हणून बाथरूम मध्ये दादा गेले असे म्हणाले!

ताई असो वा वहिनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मत मागा. ताई तुम्ही काय केलत आणी वहिनी आपण काय करणार यावर मतदान मागा. बाकी ‘आपल्या घरगुती भांडणात मतदार म्हणून आंम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही.’ राहिला प्रश्न बारामती मतदारसंघ विकासाचा तर बारामती शहरी आणी औद्योगिक भाग सोडला तर इतरत्र केंद्र तसेच राज्य सरकारचे मोठे प्रकल्प नजिकच्या काळात दिसून येत नाहीत. भोर , वेल्हे(राजगड), खडकवासला आजही वंचितच आहेत. काम भरपूर आहे. त्यामुळे सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून मत मागा!

 

आम्हाला आमच्यासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. कुणालातरी वर खुर्चीवर बसवायचं म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधी निवडायचा नाही. कुणीतरी कुणाला दगा दिला म्हणूनही आम्हाला लोकप्रतिनिधी निवडायचा नाही. जुना असो वा नवीन आपली लोकप्रतिनिधी होण्याची क्षमता आम्हाला पटवून द्या आणी खुशाल मत मागा!

ताई आणि वहिनी दोघींनाही शुभेच्छा 💐…….

निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श आपण घालून द्याल हिच आपणाकडून अपेक्षा !🙏🙏

   —– आपलचा मतदार शैलेंद्र मते(चार्टर्ड अकाऊंटंट)‌ रा. खडकवासला

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles