♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जागेवर नसलेल्या मीटरचे दरमहा रिडिंग, बिलही येतंय मात्र मीटर कुठं आहे याचं उत्तर ग्राहकाला मिळेना; महावितरणच्या पद्मावती विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पुणे: महावितरणच्या पद्मावती विभागातील कात्रज शाखेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून जागेवर नसलेल्या मीटरचे दरमहा रिडींगसह हजारो रुपयांचे बिल ग्राहकाला देण्यात येत आहे. मी बिल भरतो परंतु मीटर कुठं आहे ते तरी सांगा याची विचारणा करण्यासाठी संबंधित नागरिक महावितरणच्या कात्रज शाखा कार्यालयात हेलपाटे मारत आहे परंतु संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

(जागेवर मीटर नाही)

महेश पोत्रेकर रा. गोरक्ष स्मृती अपार्टमेंट, बी विंग, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज,पुणे यांनी 2019 मध्ये सदर ठिकाणी सदनिका खरेदी केली होती. सदनिका घेताना विज मीटरसह सर्व खर्चांचे पैसे पोत्रेकर यांनी ज्यांच्याकडून सदनिका घेतली त्यांना दिले होते. दरम्यानच्या काळात महेश पोत्रेकर हे इंदोर येथे वास्तव्यास होते. मागील पंधरा दिवसांपूर्वी पोत्रेकर आपल्या गुजर निंबाळकरवाडी येथील घरात राहण्यासाठी आले तेव्हा त्यांना घरात वीज नसल्याचे दिसले. त्यांनी खाली जाऊन पाहिले तर सर्वांचे मीटर होते परंतु पोत्रेकर यांच्याच सदनिकेचे मीटर नव्हते. धक्कादायक म्हणजे पोत्रेकर यांना त्यांच्या नावे ग्राहक क्र. 170681668431 हे मीटर असलेले व दरमहा रिडिंगसह आलेले 4780 रुपयांचे बिलही मिळाले आहे.

(रिडिंगसह आलेले बिल)

मागील पंधरा दिवसांपासून महेश पोत्रेकर महावितरणच्या कात्रज, गोकुळनगर येथील कार्यालयात मिटर कोठे आहे याची विचारणा करत आहेत मात्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पोत्रेकर यांची सहा महिन्यांची लहान मुलगी अंधारामुळे रात्रभर रडत असते. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पोत्रेकर परिवाराला मागील पंधरा दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. पोत्रेकर यांच्या नावे असलेला मीटर कोणीतरी चोरला असण्याची शक्यता असून त्याचा वापरही सुरू असल्याचे दिसत आहे. असे असताना महावितरणला मात्र तो मीटर कोठे आहे याचे उत्तर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मीटर शोधून द्यावा अशी मागणी पोत्रेकर यांनी केली आहे.

(महावितरणच्या या कार्यालयात महेश पोत्रेकर हेलपाटे मारत आहेत.)

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles