♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे व माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे:जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या माजी सभापती पूजा पारगे व माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या पुढाकारातून सिंहगड परिसरातील महिलांसाठी भव्य महिला मेळावा व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील शांताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रांतीनाना मळेगावकर आणि त्यांची मुलगी सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत न्यु होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी विविध खेळांचा आनंद लुटला.

तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, माजी नगरसेवक सचिन दोडके, सायली वांजळे, अनिता इंगळे, सुरेश गुजर, शुक्राचार्य वांजळे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

परिसरातील महिलांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

(जाहिरात सौजन्य: माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे)

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles