♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Girl Sexual assault: जन्मदात्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार; खडकवासला येथील धक्कादायक घटना; नराधम बाप अटकेत

पुणे: जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथे घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात नराधम बापाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून हवेली पोलीसांनी त्याला अटक केली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नराधम बापाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

परप्रांतीय आरोपी खडकवासला येथे पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांच्यासह राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी पत्नी लहान मुलाला घेऊन धार्मिक कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी गेली होती. वासनांध बापाने मध्यरात्री आपल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याला मुलीने विरोध केला. क्रुरकर्मा बापाने पहाटेच्या सुमारास जबरदस्तीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने इतर बहिणींना ही हकीकत सांगितली. धक्कादायक म्हणजे त्यांनंतर तिन्ही मुलींना दुचाकीवरून नराधम बापाने मुळ गावी नेऊन सोडले व निघून गेला.

मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आई व इतर नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडागळे याबाबत अधिक तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles