पुणे विद्येचं माहेरघर की नशेचं? नशेत झिंगलेल्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल
पुणे: पुणे विद्येचं माहेरघर आहे की नशेचं हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. एका बाजूला पुणे पोलिस हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत असताना दुसरीकडे वेताळ टेकडीवर नशेत झिंगलेल्या दोन तरुणींचा व्हिडिओ समाज माध्यमातून तुफान व्हायरल झाला आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी हा व्हिडिओ शेअर करत चिंता व्यक्त केली आहे.