♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस निरीक्षकांनी ‘स्वतःच’ वापरली निर्भया पथकाची गाडी; शासकीय खर्च पगारातून वसूल करण्याची मागणी

पुणे: हवेली पोलीस ठाण्यासाठी असलेल्या निर्भया पथकाच्या वाहनाचा किरकोळ अपवाद वगळता पूर्णवेळ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी स्वतःसाठी वापर केला. आपल्या पदाचा मनमानी पद्धतीने गैरवापर करणारे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी ‘निर्भया पथकाच्या’ मूळ उद्देशालाच हरताळ फासले असून चालकाचा पगार, इंधन खर्च, गाडीची झीज व देखभाल दुरुस्ती यासाठी दरम्यानच्या काळात जो काही शासकीय खर्च झाला आहे तो त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार करण्यात आली आहे.

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांसंबंधी गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरात विद्यार्थीनींची छेड काढली जाते. किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये प्रत्येक गल्लीच्या तोंडावर रोडरोमीओंच्या टोळ्या थांबलेल्या दिसतात व महिलांकडे पाहून अश्लिल हावभाव,शिव्या देतात. अशा गावगुंडांच्या भीतीने लेखी तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नाही परंतु पोलिसांनी गस्त घालून या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आलेली आहे.

महिला,मुली, विद्यार्थीनींच्या तक्रारी प्रत्यक्ष गावात येऊन किंवा शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन सोडविल्या जाव्यात व त्यात सातत्य राहावे म्हणून हवेली पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकासाठी स्वतंत्र स्कॉर्पिओ गाडी देण्यात आलेली होती. मात्र पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ही गाडी त्यांनी स्वतःसाठी घरून ये-जा करण्यासाठी, हद्दीत ‘गोपनीय ठिकाणी’ जाण्यासाठी व इतर त्यांच्या कामासाठी वापरली. या गाडीचा चालकही पूर्णवेळ त्यांच्याच दिमतीला होता. अगदी गाडी खराब होऊन बंद पडेपर्यंत पोलीस निरीक्षकांनीच ही निर्भया पथकाची गाडी वापरली. असे असेल तर महिला,मुली निर्भय कशा होणार? महिला, मुली यांच्या तक्रारी वेळीच ऐकल्या गेल्या नाहीत तर त्यांना मोठ्या अत्याचाराला सामोरे जावे लागते याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लॉग बुक’ चे गौडबंगाल

पोलीस निरीक्षकांनी पूर्णवेळ ही निर्भया पथकाची गाडी वापरली हे पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून येईल. त्यामुळे गाडीच्या लॉगबुकमध्ये खोट्या नोंदी करण्यात आलेल्या असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे खोट्या नोंदी करुन शासनाची दिशाभूल करुन शासकीय पैशांचा अपव्यय करणाऱ्या या पोलीस निरीक्षकांवर कायदेशीर कारवाई करुन झालेला सर्व खर्च त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा अशी लेखी तक्रार करण्यात आली आहे.

 

जाणीवपूर्वक या गाडीचा वापर?

निर्भया पथकाची गाडी सर्वसामान्य गाडीसारखी दिसत असल्याने व चालकही खाजगी असल्याने पोलीस गाडी असल्याचा संशय कोणाला येत नव्हता. गाडीच्या काचांना फिल्मिंग करण्यात आलेली होती त्यामुळे आतमध्ये कोण बसलंय हे सहजासहजी बाहेरुन दिसत नव्हते. त्यामुळे हद्दीतील अवैध धंदेवाल्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी निर्भया पथकाची गाडी सुरक्षित पर्याय वाटली असावी.

 

आता उपरती!

काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारातून या निर्भया पथकाच्या गाडीचे लॉग बुक मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यातून आपले पितळ उघडे पडते की काय या भीतीने गोपनीयतेचे कारण देत माहिती नाकारण्यात आली. मात्र तेव्हापासून पोलीस निरीक्षक स्वतःची खाजगी गाडी घेऊन पोलीस ठाण्यात येत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles