♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजरोसपणे नियम मोडून किरकटवाडीत अवजड वाहतूक सुरुच; हवेली पोलीसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिक हतबल

पुणे: जिल्हाधिकाऱ्यांचा किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश केराच्या टोपलीत गेल्याचे चित्र असून हवेली पोलीसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीपेक्षा हप्त्याची ताकद जास्त आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

किरकटवाडी गावातील मुख्य चौकाजवळ महावितरणच्या केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अगोदरच वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच सकाळपासून डंपरची रांग लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हवेली पोलीसांकडे आहे. मात्र हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वाहतूक पोलीस कर्मचारी ‘हम करे सो कायदा’ या आविर्भावात कारभार करत असल्याने जिल्ह्याधिऱ्यांच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष

हवेली पोलीस ठाण्याकडून वाहतूक नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत असून नांदेड फाटा, किरकटवाडी फाटा या ठिकाणी सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस केवळ धरण चौक किंवा सिंहगड पायथ्याशी थांबून दंड ‘वसुली’ करण्याला प्राधान्य देत आहेत.

 

गणवेशाला भाडे?

धक्कादायक म्हणजे हवेली पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलीसांना दर महिन्याला वाहतूक पोलीसांचा ‘सफेद गणवेश’ घालण्याचे ‘भाडे’ द्यावे लागते असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी भाड्यापोटी द्याव्या लागणाऱ्या पैशांचे नियोजन करण्यासाठी कारवाया करत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे हे भाडे कोण घेते? का घेतले जाते? याची सखोल चौकशी होऊन सरकारी वर्दीचा असा बाजार मांडणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles