♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मद्यधुंद दुचाकीस्वाराची पायी चाललेल्या महिलांना धडक; किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील घटना; गाडीला अडकवलेल्या पिशवीत गावठी दारूचे फुगे

पुणे: किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाने रस्त्याच्या कडेने पायी चाललेल्या महिलांना जोरदार धडक दिली. सुदैवाने महिलांना किरकोळ दुखापत झाली असून मागून आलेल्या डंपर चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच ब्रेक दाबल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या तोंडाला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अति मद्यपान केल्याने तोल सावरता येत नसलेल्या दुचाकीस्वाराच्या गाडीला अडकवलेल्या पिशवीत आणखी गावठी दारूचे फुगे होते.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन महिला किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरुन चालत जात होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या दुचाकीस्वाने जोरात धडक दिली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. महिलांना धडक दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व तो रस्त्यावर आपटला. यात त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. दुचाकीस्वार खाली पडला तेव्हा मागून अवजड डंपर येत होता. डंपरचालकाने प्रसंगावधान राखून वेळीच ब्रेक दाबल्याने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर वाहतूक पोलीस हवालदार सचिन कदम घटनास्थळी दाखल झाले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जखमी दुचाकीस्वाराला 108 हेल्पलाइनवर संपर्क करुन उपचारांसाठी पाठवून देण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles